कॅनडाकडून भारताच्या प्रवासी विमानांना २१ सप्टेंबरपर्यंत बंदी

करोना महासाथीमुळे उद्भवलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, भारतातून थेट येणाऱ्या प्रवासी विमानांना घातलेल्या बंदीची मुदत कॅनडाने २१ सप्टेंबरपर्यंत पुन्हा वाढवली असल्याचे देशाच्या वाहतूक मंत्रालयाने सांगितले.

एप्रिलमध्ये भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेने तडाखा दिला असताना कॅनडाने भारतातून थेट येणाऱ्या व तेथे जाणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली होती. ती उठवण्याची तारीख अनेकदा पुढे ढकलण्यात आली आहे.‘कॅनडाच्या नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता यांचे संरक्षण करणे हे प्राधान्याचे राहणार आहे. सार्वजनिक आरोग्याबाबतच्या माहितीचा आढावा घेतल्यानंतर, कॅनडा व भारत यांच्या दरम्यानच्या थेट विमान वाहतुकीवर असलेली बंदी २१ सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे’, असे कॅनडाचे वाहतूक मंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *