तुम्ही Cheque Payment करत असाल तर सावधान, ही चूक कधीही करु नका

जर तुम्ही कोणालाही चेकने पैसे देत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता तुम्हाला कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला चेक देण्यापूर्वी अधिक काळजी घ्यावी लागेल. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत, जे 1 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. मध्यवर्ती बँकेने राष्ट्रीय स्वयंचलित क्लिअरिंग हाऊस (NACH) २४ तास चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्येही लागू असेल.

या नवीन नियमानुसार, आपला चेक सुट्टीच्या दिवशीही क्लिअर केला जाईल. त्यामुळे क्लिअरन्ससाठी लागणारा वेळ कमी होईल, परंतु त्यामुळे लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण आता शनिवारी जारी केलेले चेक रविवारी देखील क्लिअर केले जाऊ शकतो.

म्हणजेच, चेकच्या क्लिअरन्ससाठी तुम्हाला तुमच्या खात्यात रक्कम शिल्लक ठेवणे गरजेचे असणार आहे. अन्यथा तुमचा चेक बाउन्स झाल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. पूर्वी चेक देताना, ग्राहकाला माहित होते की, हा चेक सुट्टीनंतरच क्लिअर होईल, परंतु आता तसे नाही. आता हा चेक सुट्टीच्या दिवशीही क्लिअर केला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *