केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE)इयत्ता बारावीचा निकाल शुक्रवारी ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. देशभरात सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
निकालाची वेबसाईट
cbseresults.nic.in या सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत लिंकवर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी आपल्या रोल नंबरच्या सहाय्याने निकाल पाहू शकणार आहेत.
दरम्यान, तत्पूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने दहावी आणि बारावीचे रोल नंबर जाहीर केले आहेत. बोर्डाने (सीबीएसई) दहावी रोल नंबर २९ जुलैपासून अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहेत. सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळांच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ दरम्यान दहावी आणि बारावीचे विद्यार्थी विद्यार्थीनी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करुन देणयात आलेल्या लिंकवरुन आपले रोल नंबर तपासू शकतात.
सीबीएसई रिझल्ट २०२१ हा अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबरची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीचे रोल नंबर पाहण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला आहे.
