बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला,प्रेमप्रकरणातून हत्येचा संशय

नागपूर शहरालगतच्या गुमगाव परिसरात एका तरुणाचा मृतदेह बुधवारी आढळला.या तरुणाचा गळा आवळून हत्या झाल्याचं संशय व्यक्त करण्यात येत आहे.सुखदेव देवाजी वरखडे असं मयत तरुणाचं नाव आहे.प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय आहे.

सुखदेव सोमवारी (वय 30) मासेमारी करण्यासाठी सोमवारी  घरून निघाला  होता.मात्र त्यानंतर तो कुणालाच दिसला नाही. दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा भाऊ राजकुमार वरखडे त्याचा शोधत होता. सुखदेवचं शोध सुरु असताना बुधवारी वागधरा-गुमगावच्या जुन्या बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाऊस जवळ त्याचा मृतदेह आढळला.त्यामुळं सर्वजण हादरून गेले..याबाबत हिंगणा पोलिसांना देण्यात आली.

मयताचे दोन्हीही हात दुपट्ट्याने बांधले होते. शिवाय त्याच्या गळ्याला दुपट्टा गुंडाळलेल्या अवस्थेत होता.तर त्याच दुपट्ट्याचा तुटलेला दुसऱ्या टोकाचा काही भाग पंप हाऊसच्या इमारतीला असलेल्या लोखंडी रेलिंगला बांधण्यात आला होता.सुखदेवला गळा आवळून मारल्यानंतर त्या इमारतीच्या लोखंडी सळाखिला लटकवून आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपीनी केला असावा परंतु दुपट्टा मधातून तुटल्याने मृतदेह खाली पडला असा संशय पोलिसांना आला. घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणी पथक बोलावण्यात आली. व वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *