कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा ‘या’ तारखेपासून होणार सुरू

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले तीन महिने स्थगित असलेली कोल्हापूर ते तिरूपती विमानसेवा एक ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील भाविकांची तिरूपतीला दर्शनासाठी जाण्याची सोय होणार आहे.

इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर ते तिरूपती विमानसेवा दिली जाते. ७५ आसन क्षमतेची ही सेवा तीन महिने बंद होती. १ ऑगस्ट अर्थात येत्या रविवारपासून ही सेवा पुन्हा सुरू होत आहे. सकाळी ११.४५ वाजता हे विमान तिरूपतीतून निघून १.४० वाजता कोल्हापुरात उतरेल. नंतर २.१० वाजता कोल्हापुरातून निघून ४.०५ मिनिटांनी तिरूपतीला पोहोचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *