मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात सोमवारी रुग्णसंख्या 5 हजाराच्या आत आली आहे. तर मुंबईतही दिलासादायक चित्र निर्माण झालं आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईतली रुग्णसंख्या 26 टक्क्यांनी घटली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.43टक्के झाला आहे तर मुंबईचा 97 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 88 हजार 729 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधीही 1हजार 324 वर गेला आहे.
राज्यात आज रोजी एकूण ८८,७२९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी मात्र ही संख्या ५ हजारांच्या खाली आली असून राज्यात मागील २४ तासांत ४,८७७ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. राज्यात सोमवारी ११,०७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण ६०,४६,१०६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.४३ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ५३ करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मत्यूदूर २.०९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६९,९५,१२२ प्रयोगशाळा नमुण्यांपैकी ६२,६९,७९९ (१३.३४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये करोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १० हजारांपेक्षा अधिक आहे. यामध्ये ठाणे, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर मुंबई, सांगली आणि साताऱ्यात ७ हजाराहून अधिक करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
