रागाच्या भरात जिवलग मित्रानेच केला मित्राचा खून.

औरंगाबादच्या संजय नगर भागात जिवलग मित्रानंच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलीये.. मंगेश मालोदे या तीस वर्षीय मुलाचा यात मृत्यू झाला आहे.. गुरूवारी रात्री ही घटना घडली आहे. मृत मंगेश हा एक खाजगी कंपनीत काम करीत होता, परिसरातच राहणा-या भु-या सोबत त्याची मैत्री होती, 21 जुलैला दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र त्या नंतर भु-याने मंगेशच्या घरी जाऊन त्याची आणि त्याच्या कुटूंबियांची माफी सुद्दा मागितली होती. त्यानंतर दोघामध्ये पुन्हा मैत्री झाली.

गुरुवारी रात्री मंगेश गल्लीत बसला असतांना भु-या त्याच्या आईसोबत जात होता, त्यावेळी पुन्हा दोघामध्ये काही तरी कारणाहून बाचाबाची झाली, त्यात मला आईसमोरच बोलला म्हणून भु-याचा राग अनावर झाला आणि त्यानं थेट चाकून मंगेशला भोसकले, त्यात मंगेश गंभीर जखमी झाला.. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंगेशला लोकांनी तात्काळ दवाखान्यात नेलं मात्र तोपर्यंत मंगेशचा मृत्यू झाला होता.. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून भु-याला अटक केलीये… मात्र फक्त आई समोर शिवीगाळ केली म्हणून मित्रानेच मित्राचा घात केलाय…

भु-या या रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्यावर याआधीही काही गुन्हे दाखल आहे.. दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केलीये..असंगाशी संग जिवाशी खेल या म्हणीची प्रचिती मात्र या ठिकाणी आलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *