रायगडमध्ये दरड कोसळून चार जणांचा मृत्यू; ५ जण ढिगाऱ्याखाली अडकलेले

राज्यात अतिवृष्टीने काल (गुरुवारी) हाहाकार माजवला. रायगड, चिपळून, महाड आदी ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेकडो नागरिक पूरात अडकलेले आहेत. तर, कित्येक भागांमध्ये दरडी कोसळल्याने मार्ग देखील बंद झालेले आहेत. पूरात अडकेलेले नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत असून, प्रशासनाकडून त्यांच्या सुटकेसाठी युद्धपताळीवर प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी रायगडमधील  महाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. तर,पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती  महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रूमकडून  देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *