खंडाळा घाटात मुंबई-पुणे लोहमार्गावर कोसळली दरड, रेल्वे वाहतूक ठप्प

मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे पालघर आणि सिंधुदूर्गमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर रायगड, कोल्हापूर, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

– अहमदनगर : नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात ६,३१० क्युसेक वेगाने पाणी सोडले, नाशिकला पाऊस सुरू असल्याने नदीच्या विसर्गामध्ये वाढ होणेची शक्यता. नगर जिल्ह्यात कोपरगाव, राहता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील नदी लगतच्या गावात दक्षतेच्या सूचना

 – खंडाळा घाटात मुंबई पुणे लोहमार्गावर मंकीहिल ते पळसदरी दरम्यान अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने मुंबई पुणे. लोहमार्गावरील रेल्वे सेवा पूर्वपणे ठप्प

– कोकण रेल्वेची वाहतूक पाणी ओसरेपर्यंत ठप्प, कोकण रेल्वेच्या मार्गावरील वाहतूक चिपळूणजवळ थांबवली. चिपळूण परिसरात मुसळधार पावसाने वाशिष्ठी पुलाखाली पाण्याची पातळी वाढल्याने धोक्याची सूचना देण्यात आली आहे.

– कोकण रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.अनेक ट्रेन स्टेशन वर रखडल्या आहेत. पाणी ओसरातच वाहतूक सुरळीत होणार अशी माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.

– मुसळधार पावसामुळे बदलापुरात रात्री 1 वाजता उल्हाननदीने धोक्याची पातळी ओलांडली, पश्र्विमेतील नदी पात्रा शेजारील अनेक भाग पाण्याखाली, घरे इमारतीतील घरात पाणी शिरले.

– अंबरनाथ, बदलापूर दरम्यान अनेक ठिकाणी रुलावरील खडी वाहून गेल्याने कर्जत ते अंबरनाथपर्यंत रेल्वे वाहतूक ठप्प सिध्देश्वर एक्स्प्रेसही पहाटे पासून बदलापूर रेल्वे स्थानकावर उभी, बदलापूर पुन्हा पुराच्या धोक्यात नागरिक धास्तावले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *