गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही पहाटेपासून राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यानुसार आज सकाळपासून मुंबई, उपनगर व वसई-विरार भागात वेगवान वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच आज सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांना समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
