बक्षिस न देणाऱ्या पालकांवरचा राग तृतीयपंथीयाने 3 महिन्याच्या चिमुरडीवर असा काढला

मुंबईतल्या कफ परेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ बक्षीस दिलं नाही म्हणून एका तृतीयपंथीयाने तीन महिन्यांच्या चिमुरडीची हत्या केली.  कफ परेडमधल्या आंबेडकर नगर परिसरातील ही घटना असून बक्षीसासाठी तृतीयपंथी मुलीच्या पालकांकडे गेला. एक साडी, एक नारळ आणि अकराशे रुपयांची मागणी त्यानं पालकांकडे केली. पण हालाखिची परिस्थिती असल्यानं मुलीचे पालक ही मागणी पूर्ण करु शकले नाहीत. याचा राग मनात धरून तृतीयपंथी तिथून निघून गेला.

पण रात्री 2 ते 3 सुमारास या तृतीयपंथीयाने आपल्या पुरुष मित्रासह येऊन मुलीचं अपहरण केलं. अपहरण करुन त्या मुलीला कप परेड इथल्या आंबेडकर नगरच्या मागील खाडीत जिवंत पुरलं.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास करत दोनही आरोपींनी अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस स्थानकासमोर काही काल तणाव निर्माण झाला होता. हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. पण पोलिसांनी नरबळीची शक्यता नाकरली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *