कोरोनाच्या संकटकाळातही मुंबई, नवी मुंबईत अनेक खासगी शाळांची मनमानी समोर आली आहे. नवी मुंबई विभागातील एकूण पाच शाळा, मुंबईतील दोन आणि पनवेलमधील एका शाळेचं नाव समोर आलं आहे. अनेक शाळांनी या संकट काळात फी वाढ केल्याचही समोर आलं होतं.
फी वाढ करणे, फी भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावणे, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना निकालपत्र न देणे असं करुन विद्यार्थी आणि पालकांना त्रास देणाऱ्या शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शाळांचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याच्या संदर्भातील प्रस्ताव शिक्षण संचालक ,पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
मुंबई, नवी मुंबईतील 8 शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव…..
फी न भरल्याने ऑनलाईन शिक्षण न दिल्याने शाळांची मान्यता रद्द?
मुंबईतील 2, नवी मुंबईतील 6 शाळांची मान्यता रद्द?
कोरोनाकाळात फी वाढ,निकालपत्र राखून ठेवण्याचा ठपका…
