चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कहर सुरुच आहे. सोमवारी रात्री गुजरातच्या सौराष्ट्र किनाऱ्यावर भीषण चक्रीवादळ धडकले आहे. यावेळी ताशी 185 किलोमीटर वेगाने वारे पुढे सरकले. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मते, हे चक्रीवादळ गेल्या 23 वर्षांत गुजरातमधील सर्वात भयंकर वादळ ठरले आहे. दरम्यान, मुंबईला लागून असलेल्या विरार पश्चिममध्ये 20 तासांपेक्षा जास्त काल वीज नव्हती. तर मुंबईत सकाळपासूनच मायानगरीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु होता. तर वरळीत झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाला.
चक्रीवादळाचा महाराष्ट्रात तडाखा
मुंबईला लागून असलेल्या विरार पश्चिममध्ये 20 तासांपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत होता. त्यामुळे अनेक भागात अंधार होता. मुंबई आणि परिसरात सकाळी या भागात बर्याच ठिकाणी मुसळधार पाऊसदेखील झाला. यामागचे कारण चक्रीवादळाचा परिणाम असल्याचे सांगण्यात येत. त्याचप्रमाणे इतर काही भागात सामान्य सार्वजनिक सेवेवर या वादळाचा परिणाम दिसून आला. महाराष्ट्रात सर्वाधिक फटका कोकण भागाला बसला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरांसह झाडांची मोठी पडझड झाली.
