कोलकात्यात करोना चाचणीत प्रत्येक दुसरी व्यक्ती आढळतेय पॉझिटिव्ह

करोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. यात आता पश्चिम बंगालमधील या बातमीने चिंतेत भर टाकली आहे. पश्चिम बंगालमध्ये करोनाने स्थिती गंभीर होत चालली आहे. मास्क न घालणं, कुठेही थुंकणं आणि सोशल डिस्टन्सिंग पालन न केल्याने त्याचे परिणाम आता समोर येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये रोज करोना रुग्णांची नवे विक्रम नोंदवत आहे. आता कोलकात्यात आरटी-पीसीआर ची चाचणी करणारी प्रत्येक दुसरी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून येत आहे. पूर्ण राज्याचा विचार केला करत प्रत्येक चौथी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. कोलकाता आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये टेस्ट करत असलेल्या लॅबमध्ये पॉझिटिव्ही रेट हा ४५ ते ५५ टक्के पोहोचला आहे, अशी माहिती लॅबमधील एका डॉक्टरने दिली आहे.

पश्चिम बंगालच्या दुसऱ्या शहरांमध्ये पॉझिव्हिटी रेट हा २४ टक्क्यांच्या जवळ आहे. एक महिन्यांपूर्वी हा दर ५ टक्के होता. अनेक नागरिकांमध्ये सौम्य किंवा अतिशय कमी लक्षणं आहेत. हे नागरिक चाचणी करत नाहीए. पण अशावेळी चाचणी न करणं धोक्याचं ठरू शकतं. यापेक्षा जास्तीत जास्त नागरिकांनी चाचणी केली पाहिजे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

१ एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये २५,७६६ नागरिकांनी करोनाची चाचणी केली होती. यापैकी १२७४ जण पॉझिटिव्ह आढळून आले. ४.९ टक्के पॉझिटिव्हिटी दर होता. तर शनिवारी ५५,०६० जणांनी चाचणी केली. यात १४ हजार २८१ जण पॉझिटिव्ह आढळून आले. हा पॉझिव्हिटी दर २५ टक्क्यांहून अधिक आहे. संसर्ग वाढण्याचं कारण म्हणजे म्युटेंट व्हायरस आहे. हा व्हायरस अतिशय कमी वेळत जास्तीत जास्त जणांना बाधित करत आहे, असं डॉक्टर्स सांगत आहेत. अनेक लॅबमध्ये पॉझिटिव्हिटी दर हा ५० टक्क्यांच्या जवळपास आहे, अशी माहिती आहे. यामुळे करोनाचा संसर्ग झालेल्यांना लवकरात लवकर शोधून आयसोलेट करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *