कोनोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने गुरुवारी रात्री आठपासून अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरात त्याचा परिणाम शुक्रवारी जाणवला. रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट होता. तर शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांची गर्दी शीव-पनवेल मार्गावर कळंबोली येथे दिसून आली. पोलीस सर्व वाहनांची चौकशी करत होते. असे असले तरी शहरात शुकशुकाट होता तसेच पोलीस तुरळक दिसत होते.
शुक्रवारी कामोठे-कळंबोली-खारघर भागात नाकाबंदी करण्यात आल्याने परवानगी नसलेल्या वाहनचालकांना परत फिरावे लागत होते. त्यामुळे काही काळ गर्दी झाली होती. नाकाबंदी करण्यात आली असली तरी शुक्रवारी अधिक कडक निर्बंधांचा पहिलाच दिवस असल्याने पोलीस सामंजस्याची भूमिका घेत होते. शहरातील सर्वच बाजारपेठा बंद दिसून येत होत्या. एपीएमसीवगळता कोठेही मोठ्या प्रमाणात पादचारी व वाहनांची वर्दळ दिसून आली नाही. मात्र पोलिसांची नजर चुकवून अनेकजण विनाकारण फिरतानाही दिसून येत होते.
सकाळी ८ ते ११ दरम्यान दुकानात गर्दी दिसून येत होती. हा कालावधी अतिशय अपुरा असून अपुरी असल्याने गर्दी होत आहे.
मुंबई : राज्य सरकारने सामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासावर निर्बंध घातल्यानंतरही शुक्रवारी अनेकांनी लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न के ला. यासाठी काहींनी अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या बनावट ओळखपत्राचा आधार घेत, तर काहींनी विनातिकीट प्रवासाचा प्रयत्न मध्य रेल्वेवर के ल्याचे उघडकीस आले.
ओळखपत्र व तिकीट पाहूनच प्रवाशांना स्थानकांमध्ये प्रवेश दिला जात होता. याशिवाय स्थानकातील फलाट, पादचारी पुलांवरही तिकीट तपासनीस तैनात करण्यात आले होते.
दादर स्थानक, कु र्ला व सीएसएमटीसह अन्य स्थानकातून एकू ण २५ प्रवाशांकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले. जप्त के लेल्या ओळखपत्रांमध्ये पालिका व विविध रुग्णालय व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नावाच्या ओळखपत्रांचा समावेश आहे. १५ प्रवाशांना दादर स्थानकात पकडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
