डोक्यात दगड घालून वडिलांची हत्या

प्रेमाला विरोध केला म्हणून अल्पवयीन मुलानं वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना डहाणू तालुक्यात घडली  आहे. हरेश्वर वासुदेव दवणे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते चिंचणी गावात राहत होते.

आपल्या मुलाचं शाळेतील मुलीशी प्रेमप्रकरण सुरू असल्याची कुणकुण हरेश्वर यांनी लागली होती. या प्रेमप्रकरणाला त्यांचा विरोध होता. वडिल आपल्या प्रेमाच्या अडसर ठरत असल्याची भावना मुलानं करून घेतली आणि रागाच्या भरात डोक्यात दगड घालून वडिलांची हत्या केली.

हत्या करणाऱ्या मुलाचं वय 16 असल्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपी मुलगा तसा शाळेत शांत कधीही कुणावर न चिडणारा. मात्र त्याच्या या अशा कृत्याने शाळेतील मुख्याध्यापकांना देखील फारच धक्का बसला आहे. या घटनेवरुन पालक आणि पाल्य यांच्यातील वैचारिक संभाषण किती गरजेचं आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *