संपूर्ण देशात कडक उन्हाळा पाहायळा मिळत आहे. उन्हाचे चटके आणि अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. असे असले तरी येत्या काही दिवसात नागरिकांना उन्हाळ्यापासून थोडा दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला आहे. येत्या काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Weather Update: IMD Orange Alert, Thunderstorm with rain)
पुढील काही दिवस तापमान 40 डिग्रीच्या खाली राहील, असा अंदाज आहे. आज (मंगळवार) पहाटे साडेपाच वाजता दिल्लीतील सफदरजंग वेधशाळेतील तापमान 20.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस राहील.
