न्यूयॉर्कमधील शाळेत स्फोट

न्यूयॉर्कमधील शाळेत स्फोट

यॉर्कमधील मॅनहट्टन शहरातील जॉन एफ. कॅनडी या माध्यमिक शाळेत झालेल्या गॅसवाहिनीच्या स्फोटात तीनजण जखमी झाले. शाळेतील सहाव्या मजल्यावर झालेल्या या स्फोटात शाळेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

जखमींपैकी एकजण अत्यव्यस्थ असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शाळेच्या सत्राला अद्याप सुरुवात झालेली नाही. नऊ सप्टेंबरपासून सत्राची सुरुवात होणार आहे. शाळेला सुट्टी असल्यामुळे येथे डागडुजीचे काम सुरु आहे. काही लोक या गॅसवाहिनीजवळ काम करत होते. त्यावेळी गुरुवारी रात्री आठ वाजता हा स्फोट झाल्याचे अधिका-यांनी सांगितले.

या स्फोटामुळे शाळेच्या इमारतीच्या तीन मजल्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खिडक्यांची तावदाने तुटली असून इमारतीभोवती मातीचा ढिगारा पसरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *