समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी अलीकडेच बलात्कारासंबंधी केलेल्या वादस्त विधानाची स्थानिक न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे.
कुलपहाड तहसीलचे न्यायाधीश अंकित गोएल यांनी मुलायम सिंहांना १६ सप्टेंबर रोजी न्यायालया समक्ष हजर होण्यासाठी समन्स बजावले आहे.
१८ ऑगस्टला लखनऊमध्ये मुलायमसिंह यांनी बलात्कार एक माणूस करतो. चौघांचे नाव हिशोब चुकते करण्यासाठी टाकले जाते. चौघेजण बलात्कार करु शकत नाहीत असे विधान केले होते.
अशी अनेक उदहारणे आहेत जिथे एका व्यक्तीने बलात्कार केला आहे पण पिडीत महिलेने हिशोब चुकते करण्यासाठी चौघांची नावे सांगितली आहेत असे विधान मुलायमसिंहांनी केले होते. असे विधान करण्याची मुलायमसिंहाची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशी विधाने केली आहेत. त्यांच्या या विधानाचा सर्वच राजकीय पक्षांनी समाचार घेतला होता.

