डॉक्टरकडून रुग्णाचा विनयभंग

तपासणी करण्याच्या बहाण्याने खासगी डॉक्टरने एका रुग्ण महिलेचा विनयभंग केल्याची घटना नाशिक कृष्णनगर भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. सुनील जी. चव्हाण असे संशयित डॉक्टरचे नाव असून, त्याचा कृष्णनगर येथे खासगी दवाखाना आहे. रविवारी (दि. २८) सायंकाळी परिसरातील महिला पतीसोबत चव्हाण डॉक्टरच्या दवाखान्यात गेली होती. तेव्हा तपासणीचा बहाणा करून चव्हाण याने महिलेचा विनयभंग केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *