भटक्या कुत्र्यांना खाऊ घातल्याने सोसायटीने कुटुंबाला ठेवलं ओलीस

कुत्र्यांना खाऊ देणाऱ्या कुटुंबाला ओलीस ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. कुटुंबाविरोधात आंदोलन करण्यासाठी इमारतीमधील रहिवासी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. भटक्या कुत्र्यांनी इमारतीमधील अनेक लहान मुलांचा चावा घेतला असून त्यांच्यामुळे नेहमी त्रास होत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. यामुळेच कुटुंबाविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी सर्व एकत्र आले होते. गुडगावमध्ये ही घटना घडली आहे.

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये रहिवासी कुटुंबाच्या घराबाहेर एकत्र आले असून घोषणा देत असल्याचं दिसत आहे. अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली होती. सेक्टर ८३ मधील जी-२१ अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये हा सगळा प्रकार घडला.रहिवाशांनी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या कुटुंबाला ओलीस ठेवलं होतं आणि कारमधून बाहेर येऊ देत नव्हते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *