पोलिस अधिकाऱ्याचा मोबाइल पळवला

अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या टेंभी नाका येथे वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांचा मोबाइल चोरट्याने चोरल्याचा प्रकार रविवारी रात्री १० वाजता घडला. यावेळी पांढरे यांनी चोरट्याला पकडण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री पांढरे पदपथावरून मोबाइलवर बोलत चालत निघाले होते. त्यावेळी समोरून आलेल्या चोरट्याने त्यांचा मोबाइल खेचला. मात्र पांढरे यांनी चोरट्याला मिठी मारली. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये दोघेही खाली पडले. तितक्यात चोरटा मोबाइल घेऊन पळून गेला. यामध्ये पांढरे हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *