२०२० हे संपूर्ण वर्ष सगळ्यांसाठी खराब गेलं आहे. हे वर्ष कोरोनाचा काळ म्हणून भयानक ठरलं. पण हे वर्ष काहींना खूप खास ठरलं आहे. भारतात तब्बल 40 अब्जाधीश वाढल्याची बातमी समोर आली आहे. यांच्यासह भारतात एकूण १७७ लोकांची अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे.
२०२० हे संपूर्ण वर्ष कोरोनामुळे अतिशय वाईट ठरलं. मात्र असं असलं तरीही भारतात एकूण ४० अब्जाधीशांमध्ये वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानींचं पुन्हा एकदा भारतातील श्रीमंतांच्या यादीत नाव आलं आहे. २०२० मध्ये अंबानींच्या संपत्तीत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगातील श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानींचा आठवा क्रमांक लागतं आहे. ऍलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. हुरन ग्लोबल रिच लिस्ट २०२१ ने जगातील श्रीमंतांची ताजी यादी नुकतीच जाहीर केली. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
