पूजा चव्हाण प्रकरणी प्रश्नावर पोलीस आयुक्तांचे सूचक हास्य

महंमदवाडी परिसरात पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्येबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या तीन आठवड्यांपासून पाळलेले मौनव्रत अद्यापही कायम आहे. पोलिस आयुक्तालयात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी केलेले सूचक हास्य आणि त्यानंतर बाळगलेले मौन चर्चेचा विषय ठरला आहे. आयुक्तांना याबाबत बोलायचे नाही की बोलू दिले जात नाही, अशीही कुजबूज सुरू झाली आहे.

सैन्यभरतीची प्रश्नपत्रिका फोडणारे रॅकेट उघडकीस आणल्याने या सर्व प्रकाराची माहिती देण्यासाठी पोलिस आयुक्त गुप्ता यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. गुप्ता यांनी प्रश्नपत्रिका फोडण्यात आल्याच्या प्रकरणाची सविस्तर माहिती दिल्यानंतर त्यांना पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर लगेचच आयुक्तांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली आणि ते तेथून हसत हसत बाहेर पडले. पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या घटनेने शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असताना पोलिस आयुक्त मौन बाळगून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *