राधे माँ च्या दरबारात लैंगिक अत्याचार – डॉली बिंद्रा

राधे माँ च्या दरबारात  लैंगिक अत्याचार – डॉली बिंद्रा

स्वंयघोषित गुरु राधे माँच्या दरबारात अश्लीलता होते. इतकचं नाही तर राधे माँ च्या दरबारात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार अभिनेत्री डॉली बिंद्रानं पोलिसात दिली आहे. तसंच तिला वेगवेगळ्या नंबरवरुन फोनवरून धमकी दिल्याचाही तिनं दावा केला आहे.

आपल्या जीवाला धोका असल्याचंही डॉली बिंद्रानं सांगितलं आहे. राधे माँच्या दरबारात पैशाची अफरातफरही होते. असा आरोपही डॉली बिंद्रानं केला आहे. या पूर्ण प्रकरणाबाबत एकूण 20 लोकांविरुद्ध डॉलीनं तक्रार दाखल केली आहे.

डॉली बिंद्राने राधे माँसह एकूण 20 लोकांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे आता राधे माँ अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *