दोन लहान मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार

औरंगाबाद  जवळच्या पळशी शिवारात पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. किरकोळ वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  धक्कादायक म्हणजे पती सिद्धेशने दोन लहान मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला आणि नंतर डोक्यात दगड घातला.

आरोपी सिद्धेश हत्येनंतर घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवत लोखंडी जाळीचे दार लावून फरार झाला. दोन्ही चिमुकल्या मुली रात्रभर मृत आईच्या शेजारी होत्या.

छोटी त्रिशा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला बिलगून झोपली होती.  दुसऱ्या दिवशीही मुलं घरात खेळत राहिली. मात्र नंतर भुकेने व्याकुळ झाल्याने मुलं रडू लागली तेव्हा शेजाऱ्यांना ही घटना कळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *