दहावीचे विद्यार्थी यंदा अतिरिक्त गुणांना मुकणार ?

दहावीचे विद्यार्थी यावर्षी अतिरिक्त गुणांना मुकणार अशी शक्यता आहे. चित्रकला परीक्षा, क्रीडा स्पर्धा न झाल्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही अशी शक्यता आहे.

दरम्यान अतिरिक्त गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यास राज्यमंडळाने मुदत वाढवून दिली आहे. यंदा दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट परीक्षा दिली असल्यास त्यांना गुण देण्यात यावेत, अशी मागणी कला शिक्षकांनी केली आहे.

त्याचप्रमाणे खेळांच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धाही रद्द झाल्या. त्यामुळे गेली काही वर्षे विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवूनही विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *