स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचं ठरवत औरंगाबाद सत्र न्यायालयानं एका रोड रोमिओला सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तरुणींना तसेच लहान मुलींनाही अशा सडकछाप रोड रोमिओंच्या जाचाला नेहमीच तोंड द्यावं लागतं. अनेकदा मुली कुणालाही न सांगता, गुपचूप हा त्रास सहन करतात. मात्र औरंगाबाद सत्र न्यायालयाच्या या निकालामुळं अशा पीडित मुलींना बळ मिळणार आहे. पुढे येऊन तक्रार केली तर अशा रोड रोमिओंना कायदेशीर मार्गानं धडा शिकवता येतो, हेच या निकालानं स्पष्ट केलं आहे.