मुंबईत सीएनजी दीड रुपये, पीएनजी ९५ पैशांनी महाग

पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ आता कॉम्प्रेस नॅचरल गॅसच्या (सीएनजी) आणि घरगुती गॅसच्या (पीएनजी) दरात महानगर गॅसने वाढ के ली आहे. ८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईत ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १.५० रुपये तर घरगुती गॅसच्या (पीएनजी)दरात प्रतियुनिट ९५ पैशांनी वाढ झाली आहे. त्यानुसार सीएनजी प्रतिकिलो ४९.४० रुपये तर घरगुती गॅस (टप्पा १) २९.८५  रुपये आणि (टप्पा २) ३५.४५ रुपयांमध्ये उपलब्ध होईल. करोनाकाळात वाढलेला संचालन आणि मनुष्यबळावरील खर्च अंशत: भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याचे महानगरने स्पष्ट केले आहे.

याआधी करोनाकाळात सीएनजीच्या कि मतीत दोन वेळा बदल झाले होते. २५ जुलैला सीएनजीच्या दरात १ रुपयांनी वाढ झाली, तर पुन्हा ६ ऑक्टोबरला सीएनजीचे दर १.५ रुपयांनी कमी झाले. या वेळी घरगुती गॅसच्या (पीएनजी) किमतीही ७० पैशांनी कमी झाल्या होत्या. सीएनजीमध्ये करोनाकाळात झालेली ही दुसरी दरवाढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *