गोरेगावमधील स्टुडिओत भीषण आग

गोरेगाव पश्चिमेकडील स्टुडिओला लागली भीषण आग. आगीमुळे स्टुडिओतील सामान जळून खाक.  बांगुर नगर येथील मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या एका चित्रीकरणाच्या स्टुडिओला दुपारी ४.३० वाजेच्या सुमारांस भीषण आग लागली. सदर आगीमध्ये जीवितहानी झाली की नाही, हे माहिती अद्यापही कळाली नसून, मात्र आगीमध्ये स्टुडिओतील सामान जळून खाक झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

स्टुडिओतील सामानाच्या विलीनीकरणाच्या कामावेळी आग लागली आहे. या आगीत सामान जळून खाक झालं आहे. आगीच्यावेळी अनेक व्हॅनिटी व्हॅन तेथे उपस्थित होत्या. मात्र अद्याप जीवितहानी झाली की नाही? याबाबत माहिती मिळाली नाही. अग्निशमनदलाच्या ८गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *