पोलिओ लसीएवेजी सॅनिटायझर पाजले !

पोलिओ लसीएवेजी सॅनिटायझर पाजले !

पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान चिमुकल्यांना पोलिओच्या लसीऐवजी चक्क सॅनिटायझर पाजण्यात आल्याची संतपाजनक घटना घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कापसी (कोपरी) येथे उघडकीस आली. सॅनिटायझर पाजल्यामुळे प्रकृती बिघडल्याने १२ बालकांना रविवारी रात्री यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव चौकशी समितीने दिला आहे.

कापसी (कोपरी) येथील पोलिओ लसीकरण केंद्रावर रविवारी  गिरीश किसन गेडाम, योगीश्री किसन गेडाम, अंश पुरुषोत्तम मेश्राम, हर्ष पुरुषोत्तम मेश्राम, भावना बापूराव आरके, वेदांत नितेश मेश्राम, राधिका नितेश मेश्राम, प्राची सुधाकर मेश्राम, माही सुधाकर मेश्राम, तनुज राम गेडाम, निशा प्रकाश मेश्राम व आस्था प्रकाश मेश्राम या बालकांना पोलिओ लसीऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आले. यानंतर  या बालकांना  मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  या बालकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.  ज्यावेळी मुलांना लस देण्यात आली, त्यावेळी लसीकरण केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका हे तिघे जण हजर होते, असे या बालकांच्या पालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *