राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Virus) नियंत्रणात असला तरी कोविड-१९ (Covid-19) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढ आहेत. तसेच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या राज्य सरकारने बंद असलेल्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचवेळी कोरोनाचा धोका नको म्हणून पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. (Maharashtra Lockdown till February 31 Thackeray government Decision) राज्यातील लॉकडाऊन 31जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यात पुन्हा कालावधी वाढविण्यात आला आहे.
या सूचना बंधनकारक
– सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
– सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक
– साबणाने सतत हात धुणे आवश्यक
नव्या स्ट्रेनमुळे लॉकडाऊनमध्ये वाढ
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे तीन प्रकार समोर आले होते. जगभरातील अनेक देशांत कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर भारतातही अनेक ठिकाणी नव्या कोरोना विषाणूंचे रुग्ण आढळले होते. राज्यातही नव्या विषाणूचे रुग्ण आढळून आलेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
