पालघरमध्ये तरुणींकडे सापडल्या २०० रुपयांच्या बनावट नोटा

पालघरमध्ये तरुणींकडे सापडल्या २०० रुपयांच्या बनावट नोटा

पालघर जवळील उमरोळी या गावात एक तरुणीकडे २०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. तरुणीला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरार परिसरातून काही तरुणी खासगी वाहनाने उमरोळी परिसरात वेगवेगळ्या सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधी म्हणून आल्या होत्या. त्यांच्याबाबत संशय आल्याने काही स्थानिक आणि त्यांच्याकडे तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे दोनशे रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे आढळले. त्यापैकी एका तरुणीला स्थानिक आणि ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले असून इतर तरुणी पसार होण्यात यशस्वी झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *