महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत पोलिसांनी थेट गुजरात जामनगरमधून आरोपीला बेड्या ठोकल्यात. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव मनोज देढीया आहे.
विशेष म्हणजे महापौरांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देणारा हा तरुण फक्त 20 वर्षाचा आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विलास तुपे यांच्या पथकाने जामनगरातून मनोज देढियाला अटक केली. त्याला घेऊन पोलीस आज मुंबईत येतील. त्याने महापौरांना धमकी का दिली याची चौकशी पोलीस करत आहेत.
महापौरांना धमकी देणाऱ्या आरोपीला आज सकाळी 11 वाजता किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. आरोपी मनोज देडिया याला आझाद मैदान पोलिसंकडून अटक करण्यात आली आहे. देडिया याला गुजरातमधील जामनगर येथून अटक केली.

