औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. यातच आज थेट सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. ट्विटमध्ये औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयासंदर्भातील एका निर्णयासंदर्भात माहिती देताना संभाजीनगर असा उल्लेख केला आहे. यात औरंगाबाद हे नाव कंसात देण्यात आलं आहे.
CMO च्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा नामोल्लेख

