कल्याण-डोंबिवलीकरांसाठी गुड न्यूज! 9 महिन्यांनंतर एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू नाही

कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्यानंतर 11 मार्चला कल्याण डोंबिवलीमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. तर 4 एप्रिल 2020 ला पहिला कोरोना मृत्यू झाला होता. तर जून महिन्यात कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. एकाच दिवसात 600 पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण याठिकाणी आढळले होते.

दरम्यान कल्याण डोंबिवलीतील कोरोनाचा मृत्यूदर इतर ठिकाणपेक्षा कमी असला तरी दररोज 1-2 मृत्यूची नोंद होतच होते. मात्र तब्बल 9 महिन्यांनंतर आज म्हणजेच 5 जानेवारी 2021 रोजी एकही कोरोना बाधिता रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या कल्याण डोंबिवलीकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक अशी माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *