मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी;

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी;

२१ डिसेंबर रोजी एका अनोळखी नंबरवरून किशोरी पेडणेकर यांना फोन आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव न सांगता पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. त्याने महापौरांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पालिका मुख्यालयात असतानाच पेडणेकर यांना हा धमकीचा फोनकॉल आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी याबाबत जवळच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ५०४, ५०६ (२), ५०७, ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे व आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे. अत्यंत नियोजनबद्धपणे आरोपीचा शोध घेतला जात आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आरोपीचा शोध लागला असून त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी शेजारच्या राज्यात एक पथक रवानाही करण्यात आलेले आहे. मात्र, या माहितीला अधिकृत दुजोरा कोणत्याही अधिकाऱ्याने दिलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *