नाशिकमध्ये गॅस गळतीमुळे घरात स्फोट

नाशिकमध्ये गॅस गळतीमुळे घरात स्फोट

नाशिकच्या खुटवडनगर परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास पगार कुटुंबाच्या घरात ही घटना घडली. या स्फोटात कुटुंबातील चार जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्फोट एवढा भीषण होता की घराचं संपूर्ण नुकसान तर झालंच आहे, पण तडे जाऊन घराची भिंतही कोसळली आहे. तसंच घरापासून 10 ते 15 फूट अंतरावर उभ्या असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटून मोठं नुकसान झालं आहे.

थंडीचे दिवस असल्याने दारं खिडक्या बंद असतात. त्यातच, गळतीमुळे गॅस सर्वत्र परसला आणि कोंडला गेला. त्यानंतर गॅस सुरु करताना किंवा इलेक्ट्रिकचे बटण चालू केल्याने हा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात. या घटनेनंतर घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी पाहणी केली. अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *