पेट्रोल-डिझेलच्या दरांत 48 दिवस बदल झाले नव्हते. त्यानंतर 20 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ होण्यास सुरूवात झाली. सांगायचं झालं तर मार्चमध्ये पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात करण्यात आली.
युनायटेड सीएनजी डिलर्स असोसिएशननं पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. पंपासाठी स्वतःची जमीन आणि यंत्रणा उभारण्यासाठी पदरचे पैसे खर्ची घालणाऱ्या पंपचालकांवर नवी पॉलिसी लादून जमिनीसह त्यांचा पंपच ताब्यात घेण्याचा महानगर गॅसचा डाव असल्याचा आरोप सीएनजी डिलर्स असोसिएशनं केलाय.
4 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर
दिल्ली 83.71
मुंबई 90.34
कोलकाता 85.19
चेन्नई 86.51
4 मेट्रो शहरांमधील डिझेलचे दर
दिल्ली 73.87
मुंबई 80.51
कोलकाता 77.44
चेन्नई 79.81
मुंबई, ठाण्यातील सीएनजी पंप चालकांनी 4 जानेवारीपासून बेमुदत बंद पुकारलाय. त्याचा मोठा परिणाम वाहतुकीवर होणारेय. आधीच सर्वसामान्यांसाठी लोकल बंद आहेत. त्यात आता सीएनजी पंपचालकांनी बंद पुकारल्यामुळे मुंबई-ठाणेकरांचे टॅक्सी-रिक्षाचेही वांदे होणारेत.