आता आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारांना निवडणुकीसाठी आपले अर्ज भरता येणार आहेत. राज्यात १४ हजार ४३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा अनेक ठिकाणी कोलमडली होती. त्यामुळे उमेदवारांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत होता. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीबाबत (Gram Panchayat Election) महत्वाची बातमी. निवडणूक आयोगाने ( Election Commission) विशेष आदेश जारी करत ऑनलाइन आग्रह सोडून ऑफलाइन अर्ज ( offline application) भरण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता ३० डिसेंबर म्हणजे आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत भरता अर्ज येणार आहे.
त्यामुळे आजच्या दिवशी अर्ज दाखल करण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने विशेष आदेश जारी करत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन आग्रह सोडून ऑफलाइन फॉर्म भरण्याची परवानगी दिली आहे