देशाता कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे डॉक्टर देखील शरीरातील रोगप्रतिकाशक्ती वाढवाण्यासाठी योग्य आहार घेण्याचा सल्ला देतात. दरम्यान नागरिकांच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये खास मिठाई तयार करण्यात आलेली आहे. ‘इम्युनिटी संदेश’ असं या मिठाईला नाव देण्यात आलं आहे. १५ विविध पदार्थांचा वापर करून ही मिठाई तयार करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल सरकारकडून या मिठाईची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी ‘इम्युनिटी संदेश’ही मिठाई गायीचे दूध, मध, हळद, तुळसी, केसर आणि वेलची यांसारख्या पदार्थांपासून तयार करण्यात आली आहे.
कोलकाता येथील मिठाई विक्रेते सुदीप मलिक यांच्या सांगण्यानुसार, ‘कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी या मिठाईचा सेवन लाभदायक ठरू शकतं. १५ विविध पदार्थांचा वापर करून ही मिठाई तयार करण्यात आली आहे. या मिठाईमध्ये साखरेचा वापर करण्यात आलेला नाही. त्याऐवजी हिमालयातून आणलेल्या मधाचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले.
देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक देश कोरोनाला नष्ट करण्यासाठी लस विकसीत करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये शरीरातील रोगप्रतिकाशक्ती वाढवाण्यासाठी आणि कोरोना विरोधात लढण्यासाठी मिठाई तयार करण्यात आली आहे.