नवी मुंबईच्या लॉकडाऊनमध्ये आणखी ७ दिवसांची वाढ

नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. त्यामुळे नवी मुंबईतील लॉकडाऊन आणखी ७ दिवसांनी वाढविण्यात आले आहे. ४४ कन्टेनमेंट झोनमध्ये सात दिवसांचे लॉकडाऊन वाढवण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ या बैठकीला उपस्थित होते. लॉकडाऊनमध्ये अधिक सुट दिल्याने रूग्णांचा आकडा वाढत असल्याचं निदर्शनास आले आहे. त्यामुळ लॉकडाऊन कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. हॉटस्पॉट असलेल्या भागातही नागरिक सोशल डिस्टन्शिंगचे पालन करत नाहीत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे या बैठकीत निर्देश देण्यात आलेत. त्यानुसार लॉकडाऊन असणार आहे.

कोरोनाबाधितांचा रूग्ण वाढत आहेत त्या ठिकाणी लॉकडाऊन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. सगळा विचार करून लॉकडाऊनमध्ये ७ दिवसांची वाढ होत आहे, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ खडसे म्हणाले.

हॉटस्पॉटमध्ये सातत्याने रूग्णांची वाढ होत आहे. त्या मोठ्या परिसराला कन्टेनमेंट झोन डिक्लर करून त्यामध्ये लॉकडाऊन आणखी ७ दिवसांनी वाढवत आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाऊस टू हाऊस मास्क स्क्रिनिंग देखील करण्यात येणार आहे. अशी माहिती आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *