शोकाकुल वातावरणात शहीद सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

येथील सुपुत्र शहीद जवान सचिन मोरे यांना अखेरची सलामी देण्यात आली. सैन्यदलाच्या १४ सशस्त्र जवानांनी ही सलामी दिली. त्यानंतर मानाचा तिरंगा ,सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी शहीद सचिन यांची पत्नी सारिका यांच्याकडे सुपूर्त  केला. वीरमाता जिजाबाई, वीरपत्नी सारिका, लहानग्या दोन्ही मुली, यांनी या तिरंग्याचा स्वीकार केला. जवान सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद सचिन मोरे यांच्या पार्थिवाला पुतण्या हर्षलकडून मुखाग्नी देण्यात आला.

शोकाकुल वातावरणात शहीद सचिन मोरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शाश्रु नयनांनी शहिद सचिन मोरे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी निरोप देण्यासाठी हजारो जनसमुदाय उपस्थित होतो. पालकमंत्री छगन भुजबळ,कृषी मंत्री दादा भुसे यांनी राज्य सरकारच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्य सरकार या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगत राज्य सरकारच्यावतीने भुजबळ यांनी आश्वासन दिले.

पूर्व लडाखच्या सीमेवरुन भारत-चीनमध्ये संघर्ष वाढल्याने तणावात भर पडली होती. यावेळी गलवान खोऱ्यात चीन सैन्यांकडून हिंसक झडप घालण्यात आली होती. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. दरम्यान, गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना दोन जवानांना पुरातून वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले होते. गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात भारतीय लष्करातील दोन जवान पाण्यात पडले. ते वाहून जात असताना त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न जवान सचिन मोरे यांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *