धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ठराव केवळ मंजूर न करता त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय देखील या सभेत घेण्यात आला. चिनी वस्तूंवर बहिष्कार करण्याचा ठराव करणारी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिका ही देशातील पहिली नगर पालिका ठरली आहे.
देशात चिनी उत्पादनांची विक्री करून चिनी कंपन्या अब्जावधी रूपये कमावून त्यावरून हत्यारे बनवून त्याचा वापर आपल्याच देशाच्या सैनिकांच्या विरोधात करतो, शिवाय संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना सारख्या महामारीची उत्पत्ती देखील चीनमध्ये झाली आहे, त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून संपूर्ण जग हैराण झालं आहे. त्यामुळे चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी उत्पादनांवर दोंडाईचा शहरात विक्री करण्यास बंदी करण्याचा ऐतिहासिक ठराव दोंडाईचा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नयनकुंवर रावल यांनी पालिकेची विशेष सभा घेवून केला आहे. देशात अधिकृत ठराव करून चिनी सामानांवर बंदी घालणारी दोंडाईचा नगरपालिका ही पहिलीच पालिका ठरली आहे.