मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या घरात कोरोनाचा शिरकाव

मातोश्रीच्या शेजारी असलेल्या बंगला नंबर २६ मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. मुख्यमंत्र्यांचे शेजारी आधीच अंधेरीच्या रुग्णालयात उपचार घेत होते, त्यातच त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा शेजारचा बंगला मुंबई महापालिकेनं सील केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वांद्र्यातील त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी राहतात. काही दिवसापूर्वी मातोश्री बंगल्याजवळचा एक चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *