करोनाची लागण झालेल्या पोलिसांचे मुर्त्यूसत्र अद्याप सुरूच असून बुधवारी कशीमिरा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंधेरी येथील सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते.
अनिल पवार यांना आठ दिवसापूर्वी करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती आणखी खालावली होती, अखेर बुधवारी पवार यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मिरा भाईंदर शहरात शोककळा पसरली आहे. अत्यंत शिष्ठबद्ध आणि कडक पोलीस अधिकारी म्हणून त्याची ओळख होती.
करोनाविरुद्ध लढा देण्याकरीता आपल्या सहकाऱ्यांना सकारात्मक मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्याचे निधन झाल्यामुळे वाहतूक पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
