भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढला आहे. चिनी सैन्याने केलेल्या हिंसाचारात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर आता भारतीय सैन्याला असाधारण परिस्थिती शस्त्र चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीनंतर चीनचा जळफळाट झाला आहे. भारताने गोळीबार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याची धमकी चीनने दिली आहे.
चीन सरकारचे भारताला धमकी दिली आहे. जर गोळीबार करण्याचा आदेश खरा असेल तर भारत-चीन सीमेवर असलेल्या दोन्ही बाजूंच्या सैन्यांमधील परस्पर विश्वास निर्माण करण्याच्या प्रक्रियेला धक्का लागणार असल्याचा इशारा दिला अग्रलेखात दिला आहे. दोन्ही देशांमधील सैन्यामध्ये वादावादी होते. मात्र, मागील काही दशकांपासून गोळी चालवण्यात आली नाही. जर, भारताने चीनच्या सैन्याविरोधात गोळी चालवली. तर सीमाभागात त्याचे पडसाद उमटणार असल्याची धमकी चीनने दिली आहे.
