अनलॉक १ नंतर कालपासून सर्व कार्यालये सुरू झाल्याने कामावर जाण्यासाठी लोकं मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. मात्र लोकलसेवा बंद असल्याने या लोकांनी आपला मोर्चा एसटी डेपोकडे वळवला असून कल्याण एसटी डेपोमध्ये आज सकाळी भयानक गर्दी पाहायला मिळाली.
कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत असताना दुसरीकडे शासनाने अनलॉक १ नुसार लॉकडाऊन शिथिल केल्याने लोकं बाहेर पडू लागले आहेत.

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव देशात चिंतेचं वातावरण बनलं असताना लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय सरकारसाठी आणखी मोठं आव्हान तर उभं करणार नाही ना? याची भीती आता वाटू लागली आहे. कामावर जाण्यासाठी लोकांची होणारी ही गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात नक्कीच अपयशी ठरणारी आहे. एवढं नक्की.