दक्षिण मुंबईत हॉटेलला मोठी आग, २५ डॉक्टरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

दक्षिण मुंबईतील मेट्रो थिएटरजवळ एका हॉटेलमध्ये आग लागली आणि एकच पळापळ झाली. याच हॉटेलमध्ये २५ डॉक्टरांचा मुक्काम होता. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरु केले. दरम्यान, लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी  युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, हॉटेलमधील २५  सर्व डॉक्टरांची सुखरुप सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

मुंबईतील धोबी तलाव परिसरात मेट्रो सिनेमा थिएटरजवळ असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये आगीचा भडका उडाला. त्यानंतर हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग भडकली. या हॉटेलमध्ये डॉक्टर्स वास्तव्याला असल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, डॉक्टरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने चिंता मिटली आहे. आगीत मोठे नुकसान झाले असून अनेक शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

मुंबईतील मरिन लाइन्स परिसरात असणाऱ्या फॉर्च्युन हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर रात्री उशिरा आग लागली. थोड्या वेळाने ही आग हॉटेलच्या चौथ्या मजल्यापर्यंत पसरली. त्यानंतर हॉटेलमध्ये एकच धावपळ सुरु झाली. धुराचे प्रचंड लोळ बाहेर पडल होते. धुरामुळे लोकांना काहीच दिसत नव्हतं. हॉटेलमध्ये डॉक्टरांसोबतच काही क्वॉरंटाइन करण्यात आलेले लोकही होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *