वाईन शॉप्स उघडूनही व्यावसायिकांपुढे ‘हे’ प्रश्न कायम

सोमवार म्हणजेच आजपासून वाईन शॉप्स उघडण्याची संमती सरकारने दिली असलती तरीही मद्यविक्रीचा व्यवसाय करणं इकतं सोपं राहणार नाही. वाईन शॉप्समध्ये साधारणपणे पंचवीस दिवस ते एक महिना पुरेल एवढा मद्यसाठा असल्यामुळे आणि अजून स्टॉक येईल अशी लक्षणं असल्यामुळे तळीरामांचे घसे कोरडे राहणार नाहीत.

महाराष्ट्र वाईन मर्चंट असोसिएशनचे दिलीप गीयानानी यांनी लोकसत्ता डॉट कॉम ला सांगितले की “दुकानांमध्ये साधारणपणे महिनाभर पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे. पण एखाद्या मद्य शौकिनाला जर समजा एखादा विशिष्ट ब्रांड हवा असेल तर त्याच्या उपलब्धतेबाबत मात्र काही सांगता येत नाही. महाराष्ट्रातील वाईन शॉप्स मागील ४५ दिवसांपासून बंद होते.

गीयानानी म्हणाले की दुकान उघडण्याची परवानगी देण्यात आली असली तरीसुद्धा दुकानदारांना समोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. त्याच्यामुळे दुकान उघडण्याची परवानगी मिळाली असली तरी होता असोसिएशनच्या काहीच सदस्यांकडून संदिग्ध अशा प्रतिक्रिया आल्या आहेत.

वाईन शॉप्स अनेक आठवड्याने उघडली असल्याने इथे येणारे सामाजिक शिस्त पाळतील का आणि शारीरिक अंतर राहतील काय याबाबत प्रश्न आहे. त्यामुळे सध्या प्रचंड ताण असलेली पोलीस यंत्रणा दारूच्या दुकानाबाहेर पुरेसा बंदोबस्त राखू शकेल का हा सुद्धा प्रश्न आहे. वाईन शॉप मध्ये काम करणारी बरीच मुलं लांबून येतात आणि सध्या लोकल ट्रेन बंद असल्यामुळे त्यांनी दुकानापर्यंत कस यावं हा प्रश्न आहे. वाईन शॉप हे तसे आकाराने लहान असल्यामुळे त्यांच्या मध्ये शारीरिक अंतर राखणे हे तितकंसं सोपं नाही. गरज पडल्यास वाईन शॉप मालकांना दुकानातल्या कर्मचाऱ्यांसाठी एखादी जागा भाडे तत्त्वावर घेऊन त्यांच्या राहण्याची सोय सुद्धा करावी लागू शकते पण तिथे सुद्धा एखाद्याचा समजा करोनाची बाधा झाली असली तर तो इतरांना सुद्धा हा रोग अजाणतेपणे देऊ शकतो ही भीती आहे.

मात्र वाईन शॉप हे विशिष्ट वेळेत प्रदीर्घ काळासाठी उघडे राहणार आहेत असा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत गेल्यानंतर दुकानांबाहेर ची गर्दी कमी होईल असा विश्वास त्यांनी दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *